बागायती शेती करा अश्या पद्धतीने

बागायती शेती:-
ज्या शेतीला बारमाही पाणी उपलब्ध असते. अशा शेतीला ‘बागायती शेती’ म्हणतात. बागायती शेतीत खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात पिके घेतली जातात किंवा जेथे खरीप  आणि रब्बी या दोन्ही हंगामात हमखास पाणी पुरवठा करणे शक्य आहे तेथे दोन पिके घेतली जातात.
बागायतीचे दोन प्रकार
    विहीर बागायत
    पाटाखाली क्षेत्र
महाराष्ट्रात बागायती शेतीमध्ये ऊस, कापूस, गहू, हरभरा, भुईमूग, सुर्यफुल, सोयाबीन, भात, ज्वारी ही बागायती पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक क्षेत्र हे विहिरीच्या पाण्याखाली भिजते, तर निम्म्याहून कमी क्षेत्र पाटाखाली भिजते. विहीर बागायतीत जेव्हा हवे तेव्हा पाणी उपलब्ध असते. तर पाटाखाली क्षेत्राला विशिष्ट कालमर्यादेने पाणी मिळते. बागायती शेतीमध्ये वर्षातून दोन, तीन किंवा चार पिके घेतली जातात. त्यामुळे बागायती शेतीत जमिनीचा वापर जास्त होतो.
बागायती शेतीची उद्दिष्टये
बागायती शेतीमध्ये पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा देता येत असल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
बागायती शेतीत पिक उत्पादनाची हमी असते.
बागायती शेतीत वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते.
बागायती शेतीतून आर्थिक उत्पन्न मोठया प्रमाणावर मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचे महत्वाचे काम बागायती शेतीमधून होताना दिसते.
उद्यानविद्या: स्वयंरोजगाराच्या संधी
उद्यानविद्या क्षेत्रात स्वंयरोजगाराच्या काही संधी –
शेती पारंपारिक पद्धतीने केली जाते. ती ब-याचदा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. परंतू उद्यान विद्या सारख्या क्षेत्रात आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याने त्यामध्ये व्यावासायासाठी अनेक संधी उपलब्ध होत आहेत. स्वयंपाक घरात लागणा-या वस्तू पासून फळे, भाजीपाला, फुले त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात इमारतीच्या आवारात शुशोभीकरणा ची ही गरज दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे या क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या अनेकानेक संधी उपलब्ध होत असतात. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
विविध फळे, भाजीपाला, फुले, मसाला पिके, औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर लागवड.
विविध पिकांच्या व्यावसायिक तत्त्वावर रोपवाटिका उभारणी.
फुले व भाजीपाला बियाणे उत्पादन.
सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादन.
विविध पिकांची हरितगृहात लागवड.
उद्यानविद्या मार्गदर्शक (Horticulture Consultant)
फुलापासून हार विक्री व सजावटीचे काम (Flower Decorator)
लॉन उत्पादन व विक्री.
शीतगृहाची उभारणी.
फळे, भाजीपाला व लागवडीची पिके (रबर, नारळ, काजू, कोको) इत्यादी. वर आधारित प्रक्रिया उद्योग.
कृषी / उद्यान पर्यटन (Agri Tourism)
विविध पिकांच्या निर्यातीद्वारे.

Comments

Popular posts from this blog

मेणबत्ती व्यवसाय-2 Lac/Month